कोल्हापूर

कोल्‍हापूर : कोरोची सरपंचपदी युतीच्या उमेदवाराचा धुव्वा उडवत अपक्ष उमेदवार

अमृता चौगुले

कबनूर (कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले तालुक्यातील कोरोची ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या युतीच्या उमेदवाराचा धुव्वा उडवत अपक्ष उमेदवार डाॕ. संतोष भोरे हे विजयी झाले.

भाजपाने त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर डाॕ. भोरे यानी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता.​ विजया नंतर डाॕ. भोरे म्हणाले, कोरोची गांवच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेऊन मला निवडून दिले आहे. कोरोची गाव हे​ राळेगणसिद्धी आणि पाटोळा पेक्षाही चांगले गाव बनवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. निवडी नंतर बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटाचे) जिल्हा अध्यक्ष रविंद्र माने यांनी डाॕ. भोरे यांचा सत्कार केला.

आमदार आवाडे व माजी आमदार हाळवणकर यानी या निवडणूकीत प्रथमतःच एकत्र येत ग्रामविकास आघाडीची स्थापना करुन ही निवडणूक लढविली होती . त्यांच्या आघाडीचे १७ पैकी ८ उमेदवार विजयी झाले. मात्र सरपंच पद गमवावे लागले. तर भाजपा वगळता इतर पक्षानी एकत्र येत कोरोची विकास आघाडीची स्थापना केली. त्यांना १७ पैकी​ ७ जागावर विजय मिळवता आला. मात्र त्यानीही सरपंच पद गमावले. तर प्रभाग क्र. ५ व​ ६ मधून दोन अपक्ष उमेदवार निवडून आले. आतां उपसरपंच पदाची निवडणूक ही सर्वस्वी अपक्ष उमेदवाराच्या पाठिंब्यावर अवलंबून राहणार आहे.

विजयी उमेदवार

कोरोची सरपंच पद​ – डॉ. संतोष भोरे​ ( अपक्ष )

ग्रामपंचायत सदस्य  

प्रभाग क्रमांक -१: शितल पाटील, तृणाल कुंभार व संगीता मगदूम ( तीनही उमेदवार ग्राम विकास आघाडी पॅनलचे )

प्रभाग क्रमांक २:​ संजय शहापुरे (ग्राम विकास आघाडी पॅनल) स्नेहल कोरोचीकर व हलीमा​ सनदी ( दोन उमेदवार कोरोची विकास आघाडी पॅनलचे )

प्रभाग क्रमांक ३: राजकुमार चावरे व सौ. आरती कुंभार ( दोन्ही उमेदवार कोरोची विकास आघाडी पॅनलचे )

प्रभाग क्रमांक ४: सौ संगीता शेट्टी व साहेबलाल शेख ( दोन्ही उमेदवार कोरोची विकास आघाडी पॅनलचे ) व विकी माने (ग्रामविकास आघाडी पॅनल)

प्रभाग क्रमांक ५ : आनंदा लोहार व अश्विनी चव्हाण (दोन्ही उमेदवार ग्राम विकास आघाडी पॅनलचे ) व पूजा टिळे (अपक्ष)

प्रभाग क्रमांक ६: आनंदी आमटे (ग्रामविकास आघाडी पॅनल), कोमल कांबळे( कोरोची विकास आघाडी पॅनल) व​ ​ ​ ​ ​ सतीश सूर्यवंशी (अपक्ष )

मी अद्याप अपक्षच : भोरे
बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र माने यांनी सत्कार केला म्हणून मी शिंदे गटाचा झालो असे नाही.​ त्यांनी मला निवडणूकीत पाठिंबा दर्शविला होता. पण मी अजूनही कोणत्या पक्षाला शब्द दिला नाही. गावाने मला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसविले आहे. गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थच ठरवतील मी कोणाच्या पक्षात व कधी प्रवेश करायचा असे मत डाॕ. भोरे यांनी व्यक्त केले.

.हेही वाचा  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT