राशिवडे-येळवडेदरम्यान अपघातात पती-पत्नीचा मृत्यू झाला 
कोल्हापूर

कोल्हापूर : राशिवडे-येळवडेदरम्यान अपघातात पती-पत्नीचा मृत्यू

मोटारसायकलवरून पुंगावकडे जात असताना अपघात

पुढारी वृत्तसेवा

राशिवडे : राशिवडे-येळवडेदरम्यान टेम्पो व मोटारसायकलमध्ये झालेल्या अपघातामध्ये संजय वसंत कांबळे (वय 48, रा. पुंगाव, ता. राधानगरी) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी सुरेखा संजय कांबळे (वय 40) यांचा उपचारादरम्यान सीपीआरमध्ये मृत्यू झाला. अपघात सायंकाळी 6.30 च्या दरम्यान घडला. या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

संजय हे पत्नीसह मोटारसायकलवरून पुंगावकडे जात होते. समोरुन येणार्‍या टेम्पोने ठोकरल्याने कांबळेंचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी सुरेखा कांबळे या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक विवाहित, तर तीन अविवाहित मुली आहेत. अपघातामुळे सिमेंटचा विद्युत पोल मोडून पडला होता. या अपघाताची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यामध्ये झाली आहे. अधिक तपास पो. उपनिरीक्षक खंडू गायकवाड, पो.कॉ. कृष्णात खामकर करत आहेत. संजय यांना चार मुलींपैकी एका मुलीचे लग्न झाले असून, ही मुलगी प्रसूतीसाठी पुंगाव गावी आली आहे, तर तीन मुली अविवाहित आहेत. शिवाय संजय यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला असून आईचे मानसिक संतुलन बिघडले आहे. अशी गंभीर स्थिती कांबळे कुटुंबाची असून तीन मुलींचे पिता, माता छत्र हरपल्याने या मुली पोरक्या झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT