सिडनी : पुढारी ऑनलाईन
ऑस्ट्रलियामध्ये २ विमानांची हवेतच समोरासमोर धडक झाल्याची घटना समोर आली आहे. सिडनीमध्ये आज (शनिवार) दोन हलकी विमाने हवेतच एकमेकांना धडकली. या भीषण दुर्घटनेत दोन्ही विमाने वनक्षेत्रात कोसळली. या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला. या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.
ऑस्ट्रेलियात या दुर्घटनेनंतर पोलिस, अग्निशमन दल, ॲब्युलन्सह बचाव पथक सिडनीपासून ५५ मील दक्षिण-पश्चिम स्थित अर्ध ग्रामीण क्षेत्रातील दुर्घस्स्थळी पोहोचले. धडक झाल्यानंतर या विमानांमध्ये आग लागली. न्यू साउथ वेल्स पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन लोकांना घेऊन जाणारे सेसना 182 विमान एका व्यक्तीला घेऊन जाणाऱ्या अल्ट्रालाइट विमानाला धडकले. पीडितांबद्दल अधिक माहिती देण्यात आली नाही.
या दोन्ही विमानांची धडक समोरासमोर झाली. त्यामुळे या विमानांमध्ये बसलेल्या लोकांमध्ये हलकल्लोळ माजला. या घटनेत ३ लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. स्थानिक लोकांना आकाशातून विमानाचे अवशेष खाली पडताना दिसले. यावेळी लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. या दुर्घटणेनंतर लागलेल्या आगीमुळे आणि भीषण परिस्थितीमुळे या ठिकाणी मदत करणे शक्य नव्हते. ऑस्ट्रेलियन ट्रान्सपोर्ट सेफ्टी ब्युरो अपघाताच्या कारणाचा तपास करणार आहे.