मुरगूड : मुरगूडचा सर पिराजीराव तलाव ३८ फुटाने पूर्ण क्षमतेने भरून गुरुवारी पहाटे ओसंडून वाहू लागला . सांडव्यातून हे पाणी गडहिंग्लज कागल मार्गावर आले आहे . वाहतूक धोकादायक स्थितीत पोहचली आहे. गेल्यावर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात भरलेला हा तलाव २० दिवस उशीरा भरला.
मुरगूड शहराबरोबरच शिंदेवाडी व यमगे या गावांना या पिण्याचा पाणीपुरवठा होतो. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास हा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे . पाणी पाहाण्यासाठी नागरिकांची सकाळपासूनच गर्दी होती .
जर उड्डाणपूल झाला असता तर ...
या तलावाचा सांडवा चक्क गडहिंग्लज कागल या राज्य मार्गावरून वाहतो . याठिकाणी सखल भाग असल्याने पाच फूटायर्यंत पाणी रस्त्यावर येते त्यामुळे जीव धोक्यात घालून वाहतूक होते याठिकाणी पिलरच्या सहाय्याने उड्डाणपूल व्हावा अशी गेल्या दहा वर्षापासूनची मागणी आहे पण या मागणीला प्रत्येक वर्षी वाटाण्याच्य अक्षता लागतात. जर पूल झाला असता तर वाहतूक सुरळीत व सुरक्षित चालू राहीली असती अशी नागरिकातून प्रतिक्रिया येत आहे .