कोल्हापूर

कोल्हापूर : राधानगरीत १५ फेऱ्यांमध्ये होणार ५८ ग्रामपंचायतींची मतमोजणी

मोहन कारंडे

गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सर्वाधिक ५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झालेल्या राधानगरी तालुक्यात मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून एकूण पंधरा फेऱ्यांत मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे. दुपारपर्यंत सर्व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

तालुक्यात करंजफेण येथे केवळ सरपंच पदासाठी मतदान झाल्याने येथील मतमोजणी पहिल्या फेरीत प्रथम होईल. पहिल्या नऊ फेऱ्यांमध्ये तीन प्रभाग असलेल्या ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे. दहाव्या फेरीपासून चार प्रभाग असलेल्या मोठ्या ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू होईल. बनाचीवाडी, राधानगरी या दोन स्थानिक ग्रामपंचायतींची मतमोजणी अंतिम फेरीच्या अखेरीस ठेवण्यात आली आहे.

राधानगरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाल्यापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंतची प्रक्रिया शांततेत पार पडली. निवडणूक निकालानंतरही तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व घटकांनी असेच सहकार्य करावे, असे आवाहन राधानगरीच्या तहसीलदार मीना निंबाळकर यांनी केले आहे.

फेरीनिहाय ग्रामपंचायती

पहिली फेरी : करंजफेण, मल्लेवाडी, आटेगाव, केळोशी खुर्द, कारीवडे.
दुसरी फेरी : पिंपळवाडी, सुळंबी, घुडेवाडी, हसणे, ओलवन.
तिसरी फेरी : तरसंबळे, धामणवाडी, वाघवडे, खामकरवाडी, मोहडे.
चौथी फेरी : तळगाव, कासारपुतळे, कांबळवाडी, मुसळवाडी, मांगोली.
पाचवी फेरी : टिटवे, मोघर्डे, सिरसे, कपिलेश्वर, मजरे कासारवाडा.
सहावी फेरी : अकनुर, पडळी, तारळे खुर्द, कुडूत्री, दुर्गमानवाड.
सातवी फेरी : राशिवडे खुर्द, कुंभारवाडी, पिरळ सावर्धन, मौजे कासारवाडा, कोते.
आठवी फेरी : आवळी खुर्द, पुंगाव, माजगाव, सावर्डे पाटणकर, आमजाई वरवडे.
नववी फेरी : सोन्याची शिरोली, अर्जुनवाडा, येळवडे, चांदे, चाफोडी तर्फ तारळे.
दहावी फेरी : शिरगाव, आवळी बुद्रुक, चंद्रे, आडोली.
अकरावी फेरी : ठीकपुर्ली, धामोड.
बारावी फेरी : तुरंबे, कसबा तारळे.
तेरावी फेरी : राशिवडे बुद्रुक, घोटवडे.
चौदावी फेरी : कौलव, बनाचीवाडी.
पंधरावी फेरी : राधानगरी

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT