Kolhapur Ganesh Visarjan 2026: कोल्हापुरातील अत्यंत देखणी अशी करवीरचा राजा बॅलिंसिंग मूर्ती दुर्दैवाने कोसळली. विसर्जन मिरवणुकीसाठी घेऊन जात असताना ही वाईट घटना घडली. वाय. पी. पोवार मित्रमंडळाने यंदाच्या गणेश उत्सवात बॅलेंसिंग मूर्तीची प्रतिष्ठापणा करून अख्ख्या जिल्ह्याचे लक्ष वेधले होते.
मात्र यंदा मुंबईत बॅलेंसिंग मुर्तींबाबत अपघातांची मालिका सुरू झाली होती. आगमनावेळी अनेक गणेश मुर्ती दुर्दैवाने कोसळल्या होत्या. आता कोल्हापुरात देखील अरूण दत्ते यांनी साकारलेली बॅलेंसिंग मूर्ती कोसळली आहे. गणेश विसर्जनासाठी नेत असताना ही मूर्ती कोसळली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
वाय. पी. पोवार नगर मित्र मंडळाने गणपती बाहेर काढताना अत्यंत काळजी घेतली होती. महापालिका आणि महावितरणचे देखील कर्मचारी सावधपणे मूर्ती बाहेर काढत होते. मात्र गोखले कॉलेज चौकात आल्यानंतर मुर्ती कोसळली. यामुळं गणेश भक्तांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोल्हापुरातील ही २१ फुटी बॅलेंसिंग गणेश मूर्ती विसर्जनासाठी नेण्याचे मोठे आव्हान होते. विजेच्या तारा, अरूंद रस्ते अन् रस्त्यावरील खड्डे यामुळं मुर्ती विसर्जनासाठी नेणे हे मोठे आव्हान होते.
वाय. पी. पोवार मित्र मंडळाने यंदा त्यांच्या करवीरच्या राजाची आगमन मिरवणूक देखील काढली नव्हती. पोलीस प्रशासानाच्या आवाहनानंतर मंडळाने मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतला होता.
यंदाच्या गणेश उत्सवात बॅलेंसिंग मुर्ती कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुंबईतील भुलेश्वरचा राजाची मूर्ती देखील आगमनावेळी कोसळली होती. या दुर्घटनेत दोन कार्यकर्त्यांना जीव गमवावा लागला.