कोल्हापूर

Kolhapur : म्हासुर्ली-चौधरवाडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी शेतकरी आक्रमक

backup backup

म्हासुर्ली; पुढारी वृत्तसेवा : म्हासुर्ली व चौधरवाडी दरम्यान वाहणाऱ्या धामणी नदीवर पाटबंधारे विभागाचा बंधारा आहे. या बंधाऱ्याची पडझड झाल्याने मे २०२२ मध्ये लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती केली होती. मात्र यावर्षीच्या पहिल्याच पावसाळ्यात पुरामुळे बंधाऱ्याच्या तळातील सिमेंट काँक्रीटचे बांधकाम वाहून गेल्याने शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे. परिणामी या बंधारा दुरुस्तीचा पैसा कुठे खर्च झाला असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच बंधाऱ्याच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी देखील शेतकरी वर्गातून होत आहे.

तीन तालुक्यात विस्तारलेल्या धामणी खोऱ्याला स्वातंत्र्यपूर्व काळापासून तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे. त्यामध्ये गेल्या २२ वर्षापासून धामणी प्रकल्प रखडल्याने उन्हाळ्यात शेतीला पाणीपुरवठा होत नाही. तसेच शासनाच्या पाटबंधारे विभागाने शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी कोनोली – शेळोशी,म्हासुर्ली – चौधरवाडी, भित्तमवाडी – गवशी, पणोरे – हरपवडे, आंबर्डे – वेतवडे गावाच्या दरम्यान धामणी नदीवर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत.परिणामी सदर बंधाऱ्यांयांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा कधीच झाला नाही.त्यामुळे शेतीव्यवसायाला तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने,यावर पर्याय म्हणून धामणी खोऱ्यातील शेतकरी सर्व बंधाऱ्यांना स्वखर्चाने समांतर मातीचे बंधारे घालून पाणीसाठा करत शेती पिकवत आहेत.

अशाप्रकारे निरुपयोगी ठरणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या सर्व गळक्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीवर शासनाच्या पाटबंधारे विभागाने कोट्यावधीचा निधी पाण्यासारखा खर्च केला आहे.मात्र त्याचा किती फायदा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना झाला हा संशोधनाचा विषय बनला आहे. शनिवारी सकाळी म्हासुर्ली – चौधरवाडी दरम्यानच्या बंधाऱ्यात बरगे घालण्यासाठी व मातीचा बंधारा उभारण्यासाठी परिसरातील शेतकरी एकत्र जमले होते.त्यावेळी सदर बंधाऱ्याची पाहणी केली असता गतवर्षी मे महिन्यात केलेले सिमेंट काँक्रीट मधील बांधकाम वाहून गेल्याचे निदर्शनात आल्याने शेतकऱ्यात संताप व्यक्त होत आहे.

त्यामुळे या बंधाऱ्याची दुरुस्ती नेमकी शेतीसाठी केली? की अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण सोयीसाठी केली? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांच्यातून व्यक्त होत आहे.तरी पाटबंधारे विभागाने संबंधित बंधाऱ्याची खातेनिहाय चौकशी करून बंधाऱ्याची नव्याने दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे .

दुरुस्ती नेमकी कोणासाठी..!

मे महिन्याच्या अखेरीस या बंधार्‍याची संबंधित विभागाकडून दुरुस्ती करण्यात आली. मात्र पहिल्याच पावसात केलेले बांधकाम वाहून गेले आहे.त्यामुळे या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीचा खर्च नेमका कोणाच्या फायद्यासाठी.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT