kolhapur Drought Update  pudhari
कोल्हापूर

Kolhapur Drought: कोल्हापूर जिल्ह्यातील ६ तालुक्यात दुष्काळ जाहीर; सर्वाधिक पाऊस पडलेल्या राधानगरी, गगनबावड्याचा समावेश

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ अन् हातकणंगले तालुक्यांना वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

Anirudha Sankpal

Kolhapur Drought Controversy : नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील देखील ६ तालुक्यांचा यात समावेश आहे. कोल्हापुरातील राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड, पन्हाळा, गगनबावडा या ६ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडलेले राधानगरी आणि गगनबावडा हे तालुक्यात देखील दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. पाऊस कमी असलेल्या शिरोळ अन् हातकणंगले तालुक्यांना वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

मुख्यमंत्र्यांनी बांधावर जाऊन अश्रू पुसले

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर केला. राज्यातील जवळपास ७५ टक्के भाग हा दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळं बळीराजाला आधार देण्यासाठी राज्य सरकारने २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

त्या प्रमाणे कोल्हापुरातील देखील ६ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मात्र या सहा तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस पडणारे तालुक्यांचा देखील समावेश असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

शेतकऱ्याना अनेक सवलती

दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यात शेतकऱ्यांना अनेक गोष्टीत दिलासा मिळणार आहे. त्यात जमीन महसुलात सूट, शेती संबंधीच्या कर्जाची वसुली थांबवणे, पीक कर्जाचे पुनर्गठन, कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत अशा महत्वाच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात येतो. त्याचबरोबर या तालुक्यात पाणी आणि जनावरांसाठी चारा छावणी असे उपक्रम देखील राबवले जातात. ग्रामीण रोजगार निर्मितीवर देखील विशेष लक्ष दिलं जातं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT