गुडाळ; पुढारी वृत्तसेवा : गुडाळ (ता. राधानगरी) येथील धनश्री आनंदराव माळवी हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षेतून महाराष्ट्र पोलीस दलात पीएसआय पदी निवड झाली. ती सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव माळवी यांची कन्या आहे.
धनश्रीचे शिक्षण एम.एस्सी पर्यंत झाले. गुडाळमधील ती पहिली महिला पीएसआय ठरली आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात तिचा भाऊ राजेश माळवी यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. धनश्रीने कोणताही क्लास न करता स्वयं अध्ययनातून हे यश मिळविल्याचे सांगितले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
हेही वाचा