कोल्हापूर

कोल्हापूर: राधानगरीतील ग्रामपंचायत निवडणुकीची ८ फेरीत मतमोजणी

अविनाश सुतार


गुडाळ :  राधानगरीतील ९ ग्रामपंचायतींसाठी आणि दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी आज (दि.५) मतदान झाले. मतमोजणी सोमवारी (दि.६) सकाळी ८ वाजता सुरु होत आहे. तहसीलदार कार्यालयाच्या आवारात असलेल्या राजर्षी शाहू हॉलमध्ये आठ फेऱ्यात मतमोजणी होणार आहे.

एकाच वेळी सहा टेबलवर मतमोजणी होणार आहे. त्यासाठी १८ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांनी दिली. आज सायंकाळी मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन सील करून राधानगरी येथील धान्य गोडाऊनमध्ये सीलबंद ठेवण्यात आली आहेत.

आठ फेऱ्यामध्ये क्रमशः अशा पद्धतीने मतमोजणी होईल

न्यू करंजे ,चांदेकरवाडी (1 ली फेरी) मांगेवाडी,फराळे, ( 2 री फेरी) बारडवाडी, फेजीवडे, (3री फेरी), पालकरवाडी, कोदवडे, म्हासुर्ली (4 थी फेरी), कसबा वाळवे (5वी व 6वी फेरी), सरवडे (7वी व 8वी फेरी)

निवडणूक आणि पोटनिवडणूक झालेल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली आहे. सोमवारी मतमोजणी परिसरात राधानगरीचे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT