Kolhapur accident 
कोल्हापूर

Kolhapur accident : पुलाची शिरोलीत मदर्साजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार

शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला

पुढारी वृत्तसेवा

नागाव : पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील मदर्साजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत शिरोली येथील ५६ वर्षीय महिला ठार झाली आहे. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. ठार झालेल्या महिलेलेचे नाव प्यारन जैनुद्दीन कवटेकर (वय ५६, रा. कवटेकर कॉलनी, बाळूमामा मंदिरामागे, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मयत प्यारन कवटेकर या नागाव फाटा येथील एका हॉटेलमध्ये कामास होत्या. शुक्रवारी रात्री ११:३० वाजण्यासुमारास हॉटेलमधील काम संपवून त्या घरी जात असताना, कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्यास व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

कवटेकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. त्यांचे पती रोजंदारीवर गवंड्याच्या हाताखाली काम करतात, तर मुलगा शिरोली एमआयडीसीत नोकरी करतो. कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून प्यारन दोन महिन्यांपासून नागाव फाट्यावरील हॉटेलमध्ये कामास लागल्या होत्या. हाॅटेलमध्ये काम करून कुटुंबाला आधार देणाऱ्या कवटेकर याचा अचानक झालेल्या अपघाती निधनामुळे कवठेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची नोंद शिरोली पोलिसात रात्री उशिरापर्यंत झाली नव्हती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT