Kolhapur Accident | टाकवडेत घराची भिंत फोडून टेम्पो थेट खोलीत; मोठे नुकसान, जीवितहानी टळली

चालकाचा ताबा सुटल्याने अपघात; नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन
Shirol  Tempo Crash
भरधाव मालवाहतूक टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो रस्त्यालगतच्या घराच्या भिंतीवर आदळलाPudhari
Published on
Updated on

Shirol Tempo Crash

शिरढोण : शिरोळ तालुक्यातील टाकवडे येथे भरधाव मालवाहतूक टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्याने तो रस्त्यालगतच्या घराच्या भिंतीवर आदळून थेट खोलीत घुसल्याची थरारक घटना मंगळवारी (दि.१८) सायंकाळी शिवाजी चौकात घडली. धडक एवढी जोरदार होती की घराच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित टेम्पो हरोलीहून टाकवडेच्या दिशेने येत होता. शिवाजी चौकातील कोकाटे हॉटेलजवळ आल्यानंतर भरधाव वेगामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर टेम्पो थेट रस्त्यालगतच्या घरावर आदळला. टेम्पोने घराची भिंत फोडून खोलीत प्रवेश केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Shirol  Tempo Crash
Leopard Attack Kolhapur | बांबवडेत भरदिवसा बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला; महिला थोडक्यात बचावली

धडकेचा मोठा आवाज झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेनंतर चालकाने घरमालकाच्या नुकसानीची भरपाई देण्याची तयारी दर्शविली. ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेनंतर नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन देण्यात आल्याने प्रकरण तात्पुरते मिटविण्यात आले.

दरम्यान, शिवाजी चौक तसेच वस्तीच्या परिसरातून भरधाव वेगाने वाहने धावत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून काळजीपूर्वक वाहन चालवावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Shirol  Tempo Crash
kolhapur | खेळताना तेरा वर्षांच्या मुलावर काळाचा घाला; अंबप येथील घटना

सुदैवाने अनर्थ टळला!

भरधाव मालवाहतूक टेम्पोचा ताबा सुटून घराची भिंत फोडत तो थेट खोलीत घुसला. अपघातात घराचे मोठे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने घरातील नागरिकांना कोणतीही इजा झाली नाही. नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे प्रकरण तात्पुरते मिटविण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news