कोल्हापूर

कोल्हापूर : पावनखिंडनजीक रस्त्यात कोसळले झाड; वाहतुकीस अडथळा

अविनाश सुतार

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा: विशाळगड मार्गावरील पावनखिंड ते मालाईवाडा दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तरी संबंधित विभागाने झाड बाजूला करून प्रवासी वर्गास तसेच वाहनचालकांस दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

ऐतिहासिक किल्ले विशाळगड मार्गावरील पावनखिंडनजीक रस्त्यातच झाड सोमवारी रात्री कोसळले. पावनखिंड व विशाळगड धार्मिक व ऐतिहासिक पर्यटनस्थळ असल्याने या मार्गावर रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. त्यातच झाड रस्त्याच्या मधोमधच पडल्याने मोठ्या वाहनांना अडथळा होत आहे. झाड कोसळूनही मंगळवारी झाड बाजूला सारले नसल्याने प्रवासी वर्गातून नाराजीचा सुरु उमटत आहे. तरी संबंधित विभागाने झाड बाजूला करून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT