कोल्हापूर

कोल्‍हापूर : वडणगे-सोनतळी मार्गावर पाच गव्यांचा कळप

निलेश पोतदार

वडणगे ; पुढारी वृत्तसेवा वडणगे (ता. करवीर) येथील सोनतळीकडे जाणाऱ्या मार्गावर अस्वले मळा, वाडकर मळा परिसरात चार ते पाच गव्यांचा कळप काल (गुरुवार) रात्री आल्‍याचे येथील रहिवाशांच्या निदर्शनास आले. दरम्यान घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी पोहोचले असून, त्यांच्याकडून गव्यांचा शोध सुरू आहे.

वडणगेतून सोनतळीकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आहे. येथे रस्त्यालगत असणाऱ्या एका गवताळ शेतात पूर्ण वाढ झालेला व एक लहान असे चार ते पाच गवे चरत असताना रात्री कामावरून घरी जाणाऱ्या येथील काही लोकांनी पाहिले. शुक्रवारी सकाळी वैरण काढण्यासाठी गेलेल्या लोकांनाही तीन गवे दिसले, याची माहिती वनविभागाला दिली.

या नंतर वनविभागाचे दोन कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून, त्यांच्याकडून गव्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान या परिसरात शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांनी व शेतमजुरांनी जाऊ नये. तसेच गव्यांना काठीने अथवा दगडाने उसकावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन सरपंच सचिन चौगले यांनी केले आहे. परीसरात गव्याच्या पायाचे ठसे आढळले असून, येथे गव्यांचा वावर असल्याचे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT