कोल्हापूर

कोल्हापूर : ‘शाहूवाडी’त १८ हजार ५६८ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पाठ्यपुस्तके

मोहन कारंडे

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : समग्र शिक्षा अंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येत असून शाहूवाडी तालुक्यातील १८ हजार ५६८ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके वितरित करण्यात येणार आहेत. गटविकास अधिकारी रामदास बघे आणि गटशिक्षणाधिकारी जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाठयपुस्तकांच्या वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील ३१२ प्राथमिक-माध्यमिक शाळांमध्ये १८ हजार ५६८ विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तक पुरवली जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी जयश्री जाधव यांनी दिली.

शाहूवाडी तालुक्यात इयत्ता पहिली ते आठवी इयत्तेच्या जिल्हा परिषदेच्या २६४ व अनुदानित माध्यमिक शाळा ४८ अशा एकूण ३१२ शाळा आहेत. विद्यार्थ्यांना ७६ हजार ७१९ पुस्तकांच्या प्रतीचे वाटप करण्यात येणार आहेत. ही सर्व पुस्तके पं.स.शिक्षण विभागातून २३ केंद्रात पोहोच झाली आहेत. कामकाजाच्या दृष्टीने केंद्रप्रमुख यांच्या माध्यमातून केंद्रस्तर ते शाळास्तर पुस्तके वाटपाचे नियोजन आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचा आनंद द्विगुणित होणार आहे.

शासन निर्णयानुसार प्रत्येक इयत्तेच्या पाठ्यपुस्तकाची रचना चार विभागांत केली असून, 'एक सत्र एक पुस्तक' याप्रमाणे तीन महिन्यांसाठी एक पुस्तक असणार आहे. या पुस्तकांमध्ये लेखन कार्य करण्यासाठी कोरे कागद समाविष्ठ आहेत.

तालुक्यातील इयत्तानिहाय विद्यार्थी संख्या :

इयत्ता         मराठी माध्यम       सेमी            एकूण

पहिली        २३७८                 ३०               २४०८
दुसरी         २३५८                  ५०              २४०८
तिसरी        २३४८                  ६०              २४०८
चौथी          २१००                   ४५             २१४५
पाचवी        १७६१                  ४५०            २२११
सहावी        १९४०                  ४२६            २३६६
सातवी        १९००                  ४९०            २३९०
आठवी       १७००                  ५३२            २२३२
एकूण         १६४८५               २०८३          १८५६८

शाळेच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले जाईल, तसेच पुस्तके चार भागात असून पहिल्या भागाच्या पाठ्यपुस्तकांचे वाटप विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. सर्वच विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील याचे योग्य नियोजन केले आहे.
– जयश्री जाधव, गटशिक्षणाधिकारी, शाहूवाडी

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT