कोल्हापूर

करवीर: मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा; दुपारी १.३० पर्यंत सरासरी ५१ टक्के मतदान

मोनिका क्षीरसागर

कसबा बावडा; पुढारी वृतसेवा:  करवीर तालुक्यातील ५३ ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीने मतदान सुरु आहे. दुपारी १.३० पर्यंत तालुक्यात सरासरी ५१ टक्के मतदान झाले. बहुतांश मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीत सकाळी साडेसात वाजता मतदान सुरू झाले. दरम्यान, वडणगे, कळंबे तर्फ ठाणे, उंचगाव गांधीनगर, मोरेवाडी, पांचगाव आदी महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये चुरशीने मतदान सुरू आहे. दुपारी १.३० पर्यंत ५१.२३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दोन्ही गटाचे उमेदवार आणि समर्थकांकडून आपल्याच उमेदवाराला मतदान करण्यासाठी मतदार राजाला शेवटच्या क्षणापर्यंत साद घातली जात आहे. चिखली येथील मतदान केंद्रावर एका गटाच्या समर्थकांनी फेट्यांसह मतदान केंद्र गाठले. यानंतर फेटेधाऱ्यांनी मतदान केंद्र गजबजून गेले होते. तालुक्यातील बोलोली ग्रामपंचायतमध्ये १०५ वर्षांच्‍या नानू संतू बाटे यांनी सकाळी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT