चंदगड : बेदरकारपणे कार चालवत समोरून येणाऱ्या दुचाकीला ठोकरल्याने मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील पेट्रोल पंपाजवळ बेळगाव - वेंगुर्ले रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
समीर बादशहा मकानदार ( वय ३७, रा. यशवंतनगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. २६ एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास समीर हे चिकन पुरवठा करण्याचे काम करतात. या कामासाठी जात असताना दुचाकी त्याचा साडभाऊ सोहेल जब्बार तांबोळे (रा. माइनकट्टी रोड व्हन्याळ, ता. जि. बेळगाव) हे चालवत होते. हे दोघे दुचाकीवरून पाटणे फाट्याच्या दिशेने जात होते. तर या दरम्यान बेळगाव कडे जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार चुकीच्या दिशेला येऊन दुचाकीला धडक दिली.
या अपघातात समीर व सोहेल हे दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर उपचार बेळगाव येथे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. यापैकी मंगळवारी समीर यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून कार चालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.