Belgaum accident: तिहेरी अपघातात एक ठार; तिघे जखमी

मृत अनगोळचा; महामार्गावर सुवर्णसौधसमोरील अपघात
accident
accidentfile photo
Published on
Updated on

बेळगाव : भरधाव कारने दुचाकीला व अन्य एका कारला धडक दिल्याने कारचालक ठार झाला, तर दुचाकीवरील एकजण आणि कारमधील दोघेजण जखमी झाले. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सुवर्णसौधसमोर रविवारी (दि. 19) सकाळी हा तिहेरी अपघात झाला.

अभिषेक (वय 35, रा. अनगोळ) असे मृत कारचालकाचे नाव आहे. मौलासाब एम. हेब्बाळी (52 रा. विरापूर, ता. कित्तूर), शोएब गिऱ्याळ (24, रा. बस्तवाड) अशी जखमी झालेल्या कारमधील दोघांची नावे आहेत. जखमी दुचाकीस्वाराचे नाव समजू शकले नाही. कारमधील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर जखमी दुचाकीस्वाराला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेची नोंद हिरेबागेवाडी पोलिस ठाण्यात झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत. कारचालक अभिषेक हा धारवाडकडून बेळगावकडे येत होता. यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले व त्याने दुचाकी आणि कारला धडक दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news