कोल्हापूर

पावणेदोन वर्षाच्या साम्राज्यने पालकांसाेबत सर केले कळसूबाई शिखर

मोनिका क्षीरसागर

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर करण्याचे प्रत्येक ट्रेकर्सचे स्वप्न असते. कोल्हापूर जिल्ह्यातील 'साम्राज्य मराठे' या पावणेदोन वर्षांच्या चिमुरड्याने आपल्‍या पालकांसाेबत कळसुबाई शिखर सर केले.सह्याद्री पर्वत रांगेतील सर्वांधिक उंचीचे कळसुबाई (KalsubaiClimb) हे शिखर आहे. त्यामुळे हे शिखर सर करण्याचे स्वप्न प्रत्येक ट्रेकर्सचं असतं. पण कमी वयात हे आव्हान पेलत ते पूर्ण करणे, ही खरी कसोटी असते.

पहाटे 'साम्राज्य' बारी गावात पोहोचला तेव्हा हे शिखर ढगाच्या आडून लपंडाव खेळत होते. अशा वातावरणात छोट्या साम्राज्यने सकाळी ७.२० वाजता भंडारदऱ्यातील बारी गावातून शिखराच्या दिशेने पालकांसाेबत आपली छोटी छोटी पावले टाकायला सुरुवात केली. दुपारी १२.४८ वाजता कळसूबाईच्या मंदिराजवळ तो पोहचला.

साम्राज्यचे वडिल (इंद्रजीत मराठे) म्हणाले, माझ्या मुलाने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. पुढेही त्याने अशीच प्रगती करावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केले. यावेळी आठ वर्षांच्या जान्हवी पाटील हिनेही कळसूबाई शिखर सर केले. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंद्रजित मराठे, सायली मराठे, अवधूत पाटील प्रोत्साहनातून साम्राज्य ने ही कामगिरी केली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT