Hasan Mushrif NCP Merger pudhari
कोल्हापूर

Hasan Mushrif NCP Merger: तटकरें-मुख्यमंत्री भेट; सुनेत्रा पवारांनी बोलावलं अन्.. मुश्रीफांनी विलीनीकरणाबाबत स्पष्टच सांगितलं

Anirudha Sankpal

Hasan Mushrif NCP Merger: राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (दि. १८ जुलै) माध्यमांशी बोलताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत भाष्य केलं. त्यांनी ज्यावेळी प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गोटात काय हालचाली झाल्या याची माहिती दिली. याचबरोबर त्यांनी विलीनीकरणाबाबत मुंबईत चर्चा होण्याची शक्यता नाही असे सुतोवाच देखील दिले.

माध्यमांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, 'विलीनीकरणाबाबत मला अजून माहिती मिळालेली नाही. मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मुख्यमंत्र्यांना भेटले त्याच्या दुसऱ्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी आम्हा प्रमुख नेत्यांना बोलवून घेतलं होतं. त्यावेळी तटकरे यांनी आपण मुख्यमंत्र्यांची भेट का घेतली हे सांगितलं.'

मुश्रीफ पुढे म्हणाले, 'पार्थ पवार देखील भेटले आहेत. मात्र आता काही कार्यक्रमांमुळं आमच्या पक्षातील नेत्यांची बैठक होणार नाहीये. २९ तारखेनंतर आमच्या कोअर कमिटीची बैठक होईल. तोपर्यंत कोणतीही शक्यता नाही. तसा काही प्रस्ताव असेलच तर सर्व खासदार आमदारांना एकत्र बोलवून याबाबत सांगितलं जाईल.'

हसन मुश्रीफ यांनी विलीनीकरणाबाबतची चर्चा दिल्लीतच होईल मुंबई पातळीवर काही शक्यता नाही असं देखील सांगितलं ते म्हणाले, '२२ तारखेपासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. जर तसा काही प्रस्ताव असेल तर पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दिल्लीत भेटतील आणि त्यांची चर्चा होईल. मुंबईत याची चर्चा होण्याची काही शक्यता नाही.'

मुश्रीफ यांनी मंत्रीपदाच्या चर्चेबाबत देखील अजून काहीही माहिती नाही ही बातमी मी प्रसार माध्यमांवरच पाहिली आहे असं सांगत अधिक माहिती देणं टाळलं. जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले की, जयंत पाटील हे इश्वरपूरचे नगराध्यक्षांना अपात्र करण्यात आले आहे त्याबाबत भेटायला गेले होते असं त्यांनी सांगितलं. मात्र नेमकं काय भेटले याची माहिती मला नाहीये त्यामुळं मी काही सांगू शकणा रनाही.

मुश्रीफांनी प्रफुल्ल पटेल नाराज असल्याच्या चर्चेवर देखील उत्तर दिलं. त्यांनी नाराजीचे वृत्त फेटाळून लावत असे काहीही नाही आमचा पक्ष एकसंध आहे असं सांगितलं.

जयंत पाटील हे ईश्वरपूरचे नागराध्यक्षांना अपात्र करण्यात आले आहेय त्याबाबत भेटायला गेले होते असे त्यांनी सांगितले आहे. अर्थमंत्रीपदाबाबत मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार गृहमंत्री अमित शहा यांना भेटून आले आहेत. त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यामुळं हे अधिवेशन झाल्यावर त्याबद्दल चर्चा सुर होईल.

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार गृहमंत्री अमित शाह यांना भेटून आले आहेत, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झालेली आहे.. त्यामुळे हे अधिवेशन झाल्यानंतर त्याबद्दल चर्चा सुरू होईल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT