Hasan Mushrif Vs Satej Patil pudhari
कोल्हापूर

Hasan Mushrif Vs Satej Patil: अध्यक्षपदाचा फॉर्म्युला सतेज पाटलांनीच द्यावा... गोकुळ कोंडीवर हसन मुश्रीफांचे सुचक वक्तव्य

सतेज पाटील हे कोर्टात गेले आहेत तर त्यांनीच अध्यक्षपदाचा फॉर्म्युला द्यावा असे सांगत बॉल सतेज पाटील यांच्या कोर्टात ढकलला.

Anirudha Sankpal

Hasan Mushrif Vs Satej Patil: ऊस दराचा प्रश्न सुटल्यानंतर आता गोकुळच्या अध्यक्ष निवडीबाबतची कोंडी कधी फुटणार याकडे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अनेक सुचक वक्तव्य केले आहेत. मुश्रीफ यांनी जर सतेज पाटील हे कोर्टात गेले आहेत तर त्यांनीच अध्यक्षपदाचा फॉर्म्युला द्यावा असे सांगत बॉल सतेज पाटील यांच्या कोर्टात ढकलला.

काय म्हणाले मुश्रीफ

कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना हसन मुश्रीफ म्हणाले, 'गोकुळमध्ये एक विशिष्ट परिस्थिती तयार झाली आहे. १३ समविचारीच आणि १२ महायुतीचे संचालक निवडून आले आहेत. गोकुळचा कोरम हा १४ चा आहे. हा एकमेव दूध संघ असा आहे जिथं संचालकांचा कोरम हा १४ चा आहे.'

'सविचारीकडे १३ संचालक आहेत त्यामुळे त्यांना १ संचालक कमी पडत आहे. तर आमच्याकडे १२ संचालक आहेत त्यामुळे २ संचालक कमी आहेत. नियमाप्रमाणे तीन मिटिंगला गैरहजर राहिलो तर त्या ठिकाणी प्रशासक येतात अन् पुन्हा निवडणूक लागते.

दुसरा पर्याय नव्हता

लोकशाही टिकवण्यासाठी आमच्याकडे दुसरा काही मार्ग नव्हता. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे मग आमचे संचालक त्यांचा अध्यक्ष निवडण्यासाठी का जातील. कायद्यात १४ चा कोरम असल्याने डेडलॉक तयार झाला आहे.'

सतेज पाटील यांच्या ९ नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत देखील हसन मुश्रीफ यांनी वक्तव्य केलं. ते म्हणाले की, सतेज पाटील यांना ९ तारखेला मोर्चा काढायचा असेल तर काढू द्या. त्यांना बहुमत मिळालं आहे. मात्र १४ चा अपेक्षित आकडा ते गाठू शकलेले नाहीत. शासनाने हा डेडलॉक संपवण्याचा निर्णय घेतला.'

आता सतेज पाटलांनीच फॉर्म्युला द्यावा

मुश्रीफ यांनी आता सतेज पाटील यांनीच फॉर्म्युला द्यावा असं देखील वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'ते जर कोर्टात गेले तर अध्यक्षपदाचा फॉर्म्युला त्यांनाच देणं गरजेचं होतं. सतेज पाटील यांनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमदारांच्या विरोधात हाताला हात बांधलेले पोस्टर लावले आहेत. जय पराजय होत असतात पण माझ्या मुलाबद्दल जे केलंत त्याबद्दल फार खंत वाटते ते जिव्हारी लागले आहे. तिढा सुटला तर २५ लोक एकत्र बसतील आणि बंटी पाटील यांना अपेक्षित असलेला कारभार होईल.' असे देखील सुचक वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT