Hasan Mushrif | वैद्यकीय महाविद्यालयाची बांधकामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करा : मंत्री मुश्रीफ

कोल्हापूर  : बांधकाम आढावा बैठकीत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ, अधिष्ठाता डाॅ. सदानंद भिसे, बांधकाम विभागाचे अधिकारी आदी.
कोल्हापूर : बांधकाम आढावा बैठकीत बोलताना मंत्री हसन मुश्रीफ, अधिष्ठाता डाॅ. सदानंद भिसे, बांधकाम विभागाचे अधिकारी आदी.
Published on: 
Updated on: 

कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शेंडा पार्क येथे उभारण्यात येणाऱ्या ६०० खाटांच्या (जनरल बेड) अद्ययावत रुग्णालयाच्या उद्‌घाटनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणण्याचा मानस आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या परिसरातील सुरू असलेली सर्व बांधकामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश कंत्राटदारांना दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शेंडा पार्क येथे उभारण्यात येत असलेले ६०० जनरल बेड, २५० कॅन्सर व २५० सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, सांगाव येथील शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथिक महाविद्यालय, उत्तूर येथील शासकीय योग व निसर्गोपचार केंद्र तसेच सीपीआरमधील प्रलंबित कामांचा आढावा मुश्रीफ यांनी घेतला.

​मंत्री मुश्रीफ म्हणाले, मौजे सांगाव येथे सुरू होणाऱ्या शासकीय आयुर्वेदिक व होमिओपॅथिक महाविद्यालयासाठी प्रत्येकी १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेला मान्यता मिळाली असून, प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. याशिवाय उत्तूर येथे उभारण्यात येत असलेल्या राज्यातील पहिल्या शासकीय योग व निसर्गोपचार महाविद्यालयात २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी तिसऱ्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. २० एकर जागेत उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात ६० खाटांचे अद्ययावत रुग्णालय आणि १० राखीव खाटा (ज्यात ४ व्हीआयपी खाटांचा समावेश आहे) असतील. तसेच दररोज सुमारे एक हजार बाह्यरुग्णांवर एकाच वेळी उपचार करता येतील, अशी व्यवस्था येथे निर्माण केली जात आहे. ​​बैठकीस वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, अधीक्षक अभियंता तुषार बुरुड, उपअधीक्षक डॉ. गिरीष कांबळे, अधिष्ठाता डॉ. अभिजीत अहिरे, डॉ. भाग्यश्री खोत, डॉ. भूषण मिरजे, कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.