कोल्हापूर

बाळूमामा देवालय समितीला सर्वतोपरी सहकार्य करु : गोव्‍याचे मंत्री सुभाष फळदेसाईंची ग्‍वाही

अविनाश सुतार

मुदाळतिट्टा: पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र आदमापूर येथील सद्गुरू बाळूमामा जागृत देवस्थान आहे. येथे गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात. आपण ही बाळूमामाचे भक्त आहोत. देवालय समितीला सर्वतोपरी सहकार्य करु, अशी ग्‍वाही  गोवा राज्याचे समाजकल्याण, नदी जलवाहतूक, पुरातत्व साधन, संवर्धन मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिले.

मंत्री देसाई यांनी आदमापूर येथे सपत्नीक भेट देऊन बाळूमामाचे दर्शन घेतले. यावेळी बाळूमामा देवालय समितीच्या वतीने मंत्री फळदेसाई यांचा कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांच्या हस्ते बाळूमामाचा विजयग्रंथ व आशीर्वादाचा नारळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशीलराजे भोसले आदीसह मान्यवर उपस्थित होते.

संजय कणसे यांनी स्वागत केले. या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय पाटील, गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, सरपंच विजय गुरव, सरपंच राजनंदिनी भोसले, यशवंतराव पाटील, बाळूमामा देवालय समितीचे सर्व सदस्य, बकरी संगोपन समिती सदस्य व उत्सव कमिटी सदस उपस्थित होते. प्रा. एस. पी. पाटील यांनी आभार मानले.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT