जिल्ह्यात खुलेआम विक्री; मावा, गांजा उपलब्ध होतोच कसा? राजकीय आश्रय  
कोल्हापूर

आलास, गणेशवाडीत मावा विक्री जोरात; अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष

परिसरातील वाढते व्यसनाधीनतेचे प्रमाण पाहता, अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ आणि कठोर मोहीम हाती घ्यावी

पुढारी वृत्तसेवा

महादेव शहापूरे

कवठेगुलंद : ​आलास आणि गणेशवाडी (ता. शिरोळ) परिसर, आसपासच्या गावांमध्ये सध्या बेकायदेशीर मावा आणि सुगंधी तंबाखूची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र आहे. शाळकरी मुलांपासून ते तरुणांपर्यंत अनेकांना या व्यसनाने विळखा घातला आहे. असे असतानाही अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिसांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

प्रशासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, मावा आणि सुगंधी तंबाखूची विक्री ठिकठिकाणच्या पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि हॉटेलमध्ये राजरोसपणे सुरू आहे. या परिसरात अनेक शिक्षण संस्था आहेत. कॉलेजचे तरुण आणि अगदी शाळकरी मुलेही या माव्याच्या आहारी जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

​'अन्न व औषध प्रशासन' विभागाकडून केवळ नावापुरती किंवा एखादी तक्रार आल्यावरच कारवाई केली जाते, अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे. नियमित तपासणी आणि कडक कारवाई अभावी विक्रेत्यांचे धाडस वाढले आहे. परिसरातील वाढते व्यसनाधीनतेचे प्रमाण पाहता, अन्न व औषध प्रशासनाने तात्काळ आणि कठोर मोहीम हाती घ्यावी. बेकायदेशीर मावा तयार करणारे आणि त्याची विक्री करणारे मुख्य विक्रेते यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांच्या दुकानांना टाळे ठोकण्यात यावे, अशी मागणी आलास व गणेशवाडीतील सुजाण नागरिकांकडून केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT