कोल्हापूर

कोल्हापूर : कुरुंदवाड-भैरववाडी येथील दारू अड्डा म्हणजे गुन्हेगारी निर्मितीचे केंद्र

दिनेश चोरगे

[author title="जमीर पठाण" image="http://"][/author]

कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा :  कुरुंदवाड येथील भैरववाडी पुलाजवळ विषारी हातभट्टी दारूच्या अवैध व्यवसायाने डोके वर काढले आहे. शहरातील ४ ते ६ युवकांचा हातभट्टी दारूने बळी गेला आहे. या हातभट्टी दारूच्या मोहासाठी युवा पिढी बरबाद होत असून ती मिळविण्यासाठी तरूण गुन्हेगारी प्रवृत्तीकडे जात आहे. हा दारू अड्डा म्हणजे गुन्हेगारी निर्मितीचे केंद्र बनले आहे, असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. हे पोलीस प्रशासनाला दिसत नाही का? असा संतप्त सवाल आता नागरिकांतून उपस्थित होत आहे.

दरम्यान भैरववाडी पुलाजवळ दोन दिवसांपूर्वी हात-भट्टी दारू अड्डा बंद करावा, अशी मागणी शेजाऱ्यांनी केली असता मोठा वाद झाला मात्र याबाबत पोलिसात कोणताच गुन्हा दाखल झाला नाही. यापाठीमागचे गौडबंगाल काय? हे समजू शकले नाही. येथील भैरववाडी पुलाच्या आडोशाला हातभट्टी दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू आहे. ही हातभट्टीची दारु पिल्याने चार युवकांचा दुर्दैवी अंत झाला. अनेकजण सध्या या दारूच्या आहारी गेले आहेत.अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या दारूच्या व्यसनाच्या आहारी जाऊन एका युवकाने शहरांमध्ये मारामारी केल्याने एका वीट भट्टी कामगाराचा मृत्यू झाला होता. यामुळे एक कुटुंब उध्वस्त झाले तर दुसरे कुटुंब आपला मुलगा तुरुंगात गेला या दुःखाने उध्वस्त झाले.

शहरात सध्या या दारूसाठी किरकोळ भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुळातच भैरववाडी पुलालगत सुरू असलेल्या हातभट्टी दारूने अनेकांचे संसार उध्वस्त केले आहेत. मात्र पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. या परिसरातील नागरिकांनी हा दारू अड्डा बंद व्हावा, यासाठी कुरुंदवाड पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. स्थानिक पोलीस प्रशासन याबाबत कारवाईसाठी पुढे येत नसल्याने वरिष्ठ पोलीस प्रशासनाने या अड्ड्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT