कोल्हापूर

गणेश चतुर्थीच्या पार्श्‍वभूमीवर कुरूंदवाड पोलिसांकडून ३४ जणांवर हद्दपारीची कारवाई

backup backup

कुरुंदवाड, पुढारी वृत्तसेवा : कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष नूर काले, राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हा सचिव उदय पाटील सह ३४ जणांना शिरोळ तालुक्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसांकडून देण्यात आली आहे.

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात गणेशोत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टिकोनातून पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असणाऱ्या प्रदीप गजानन मांजरे, जयप्रभा मांजरे, ओमकार उर्फ गोटू गजानन मांजरे, अजित सावंत देवताळे, प्रवीण गोलिंगा अनुरे, सुरज महादेव हुल्लोळे, रामय्या चन्नम्मा, आसिफ फरदीन पठाण,अमोल बाळासाहेब म्हैशाळे, अरुण गौतम कांबळे, सुशांत बाळू कांबळे, अक्षय कुमार, विजय कांबळे, नितीन प्रदीप कांबळे, शितल उर्फ पप्पू सुभाष कांबळे, पवन सुभाष कांबळे, विकी उर्फ विकास एकनाथ कांबळे, गोटू उर्फ निलेश सदाशिव कांबळे, सचिन अण्णा दतवाडे, विठ्ठल लक्ष्मण कांबळे (20 जण.रा. गणेशवाडी,ता. शिरोळ), नूर काले, उदय पाटील, सतीश परशुराम वडर(तिघे रा.दतवाड,ता.शिरोळ), स्वप्निल उर्फ बंडू कडाळे, बाबासाहेब पाटील,सनी आकाराम कारंडे (तिघे.रा.कुरुंदवाड),अल्ताफ अकबर बेपारी, मौला बाशा बेपारी, झाकीर अकबर बेपारी(तिघे रा.औरवाड,ता.शिरोळ) विशाल बाळू वर्धन (रा.शिरदवाड,ता.शिरोळ) दिलीप आण्णाप्पा उगारे(रा.अब्दुल लाट,ता.शिरोळ), अनिल भास्कर कांबळे(रा.नवे दानवाड,ता.शिरोळ), महेबूब दिलावर गलगले(रा. हेरवाड,ता.शिरोळ)या ३४ जणांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनंत चतुर्थी पर्यंत शिरोळ तालुक्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचलंत का?

SCROLL FOR NEXT