कोल्हापूर

कोल्हापूर : नृसिंहवाडी येथे श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास प्रारंभ

अविनाश सुतार

नृसिंहवाडी; पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर घाटावर आज (दि.२८) श्री कृष्णावेणी मातेच्या उत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. आजपासून दहा दिवस हा उत्सव सुरू राहणार आहे. भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन उत्सव मंडळाने केले असून, दत्त मंदिराच्या उत्तर बाजूस शामियाना उभारण्यात आला आहे.

सचिन, संदीप कागलकर परिवार या मानकऱ्यांच्या निवासस्थानातून आज सकाळी सहा वाजता कृष्णावेणी मातेची सालंकृत मूर्ती मिरवणुकीने उत्सव मंडपात आणण्यात आली. नृसिंहवाडीसह कुरुंदवाड, शिरोळ, इचलकरंजी, सांगली आदी भागातून आलेल्या महिलांनी मिरवणुकीवेळी कृष्णावेणी मातेस पंचारतीने ओवाळले व आशीर्वाद घेतले.

सकाळी अकरा वाजता कृष्णावेणी मातेची वेदशास्त्र संपन्न अवधूतशास्त्री बोरगावकर व दिलीप उपाध्ये यांच्या पौरोहित्याखाली नवल खोंबारे यांनी विधिवत प्रतिष्ठापना केली. व जगतकल्याणासाठी प्रार्थना केली. दुपारी नैवेद्य आरती झाल्यानंतर तीन वाजता एकवीरा भजनी मंडळ यांचे कृष्णा लहरी पठण, चार वाजता वेद शास्त्र संपन्न हरी चोपदार यांचे पुराण सायंकाळी प्रसाद शेवडे (देवगड) ह.भ.प.नंदकुमार कर्वे (रा. पनवेल) यांचे सुश्राव्य कीर्तन असे कार्यक्रम संपन्न झाले.

संस्कार भारतीच्या रांगोळ्यांनी रस्ते खुलले

संस्कार भारती शाखा नृसिंहवाडी व सोलापूर यांनी पूर्ण मिरवणूक मार्गावर घातलेल्या आकर्षक रांगोळी व नयनरम्य गालीच्यामुळे मिरवणूक मार्गावरील रस्ते विलोभनीय दिसत होते. रविवारी (दि. २९) दुपारी ५ वाजता भाग्येश मराठे (मुंबई) यांचे गायन व रात्री ९.३० वाजता ह.भ.प.नंदकुमार कर्वे (रा. पनवेल) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT