कोल्हापूर

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे नारळी पौर्णिमेनिमित्त विविध रंगाच्या फुलांच्या माळांचीआकर्षक सजावट

अमृता चौगुले

नृसिंहवाडी पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे नारळी पौर्णिमेनिमित्त रात्री धुपारती नदीची पूजा सेवेकरी मंडळी कडून मंत्रपठण शेजारती असे कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. श्रींच्या उत्सव मूर्तीची विविध रंगाच्या फुलांच्या माळांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मुख्य दत्त मंदिर पाण्यात असल्यामुळे परमपूज्य नारायण स्वामी मंदिरात श्रींच्या उत्सव मूर्तीच्या दर्शनासाठी रांगा लागल्या.

श्रावण महिना गुरुवार व नारळी पौर्णिमा असा तिहेरी योग आल्यामुळे सकाळपासूनच मंदिरात गर्दी झाली होती. आज दिवसभर पावसाची संतत धार सुरू होती. भाविकांनी कृष्णा नदीत स्नान करून नदीत नारळ अर्पण केले. महिलांची संख्या लक्षणीय होती मंदिरातील कृष्णा नदीचे पाणी हळूहळू वाढत आहे मुख्य दत्त मंदिर उद्या 12 ऑगस्टपर्यंत पूर्णपणे कृष्णा नदीच्या पाण्यात जाईल चित्र आहे. दोन दिवस पौर्णिमा असल्यामुळे उद्याही येथे गर्दी होण्याची शक्यता आहे. कृष्णा नदीला आलेले पुराचे पाणी अलमट्टीच्या विसर्ग वाढल्यामुळे येथे संथ गतीने वाढत आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT