राधानगरी धरणाचा पाचवा दरवाजा खुला, पावसाचा जोर कायम | पुढारी

राधानगरी धरणाचा पाचवा दरवाजा खुला, पावसाचा जोर कायम

राधानगरी, पुढारी वृत्तसेवा : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे पाच दरवाजे खुले झाले आहेत. पाच दरवाजांमधून 7140 क्युसेक तर विजगृहातून 1600 क्युसेक असा एकूण 8740 क्यूसेक विसर्ग भोगावती नदीपात्रात होत आहे.

बुधवारी चार दरवाजे खुले झाले होते. दुपारनंतर पावसाने थोडी उघडीप दिल्यामुळे रात्री व आज पहाटे दोन दरवाजे बंद झाले होते. आज (दि. ११) सकाळपासून पुन्हा पावसाने दमदार सुरुवात केल्यामुळे दुपारी ४.११ वा. तीन क्रमांकाचा व ४.१५ वा. चार क्रमांकाचा व ५.११ वा. सात क्रमांकाचा दरवाजा खुला झाला आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास आणखी दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे.

 

Back to top button