कोल्हापूर

कोल्‍हापूर: मुरगूडमध्ये कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांच्या पुतळ्याचे दहन

अमृता चौगुले

मुरगूड(कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकचे मुख्यमंत्र्याकडून महाराष्ट्राची सतत अवहेलना सुरु आहे. तसेच कन्नड वेदिका संघटनेकडून महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड केली जात आहे. या घटनेचा मुरगूडमध्ये बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करुन कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांच्या नेतृत्वाखाली येथील छ . शिवाजी महाराज पुतळ्याजवळ कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. एसटी बसस्थानक चौकापर्यंत कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच कर्नाटकला जशास तसे उत्तर देवू कर्नाटक मंत्र्यांना व त्यांच्या वाहनांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

.हेही वाचा

SCROLL FOR NEXT