कोल्हापूर

अबब..! साडेचार फूट लांबीची घोरपड!

अनुराधा कोरवी

केंबळी; पुढारी वृत्तसेवा:

मळगे खुर्द (ता. कागल) येथे राहत्या घरी चक्क साडेचार फूट लांबीची व पाच किलो वजनाची घोरपड आढळून आली. मळगे खुर्द येथील अमित गोते यांच्या घरी जळणाच्या शेणकुटात जाडजूड दोन फूट लांबीची शेपूट पाहून भला मोठा सर्प असावा म्हणून घरातील सर्वजण घाबरले. यानंतर त्यांनी लागलीच बाचणी येथील सर्पमित्र मंगेश खामकर यांना बोलावण्यात आले.

खामकर यांनी लगोलग घटनास्थळी धाव घेत शेपटीचे निरीक्षण करताच घोरपड असल्याचे सांगितले आणि सुमारे पाच किलो वजनाच्या साडेचार फूट लांबीचे घोरपडीचे धूड अलगद बाहेर काढून माळरानात तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT