kdcc 
कोल्हापूर

Kolhapur news | राधानगरीत केडीसीसीसाठी 915 ठराव दाखल!

राधानगरीत केडीसीसीसाठी 915 ठराव दाखल!

पुढारी वृत्तसेवा

गुडाळ: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी राधानगरी तालुक्यात हालचालींना वेग आला आहे. अंतिम मुदतीच्या दिवशी तालुक्यातील १०५१ सभासद सहकारी संस्थांपैकी ९१५ संस्थांनी आपल्या प्रतिनिधींचे ठराव दाखल केले. विशेष म्हणजे मुदत संपण्यापूर्वीच्या तीन दिवसातच तब्बल 707 ठराव दाखल झाले आहेत.

गट नंबर एक विकास संस्था गटात पात्र 201 संस्था पैकी सर्वच संस्थांनी ठराव दाखल केले. विद्यमान संचालक ए वाय पाटील यांनी शक्ती प्रदर्शनाने ठराव दाखल केले. विकास संस्था गटातील प्रतिनिधींच्या यादीवर नजर टाकली असता मातब्बर मंडळींनी आपल्या नावे ठराव घेतल्याने या गटात हाय व्होल्टेज निवडणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अन्य गटात दाखल झालेले ठराव असे, कंसात ठराव संख्या - गट नंबर दोन (1),गट नंबर तीन( 50), गट नंबर चार (71 ),गट नंबर पाच (510),गट नंबर 6 (82). तालुक्यातील एकूण मतदार संख्या पाहता विकास संस्था गटा व्यतिरिक्त अन्य गटातूनही तालुक्याला संचालक पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी मधून दूध संस्था गटातून भोगावतीचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील-कौलवकर तर महिला राखीव गटातून त्यांच्या सुविद्य पत्नी आणि माजी आमदार के पी पाटील यांच्या सुकन्या माजी सभापती रूपाली पाटील-कौलवकर यांचा प्रमुख इच्छुकात समावेश आहे. कौलवकर गटाने सोमवारी शक्ती प्रदर्शन करून ठराव दाखल केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT