District Bank Election | जिल्‍हा बँकेसाठी १०,१७९ ठराव दाखल

ठराव सादर करण्‍याची प्रक्रिया पूर्ण; अखेरच्‍या दिवशी २६०० ठराव प्राप्‍त
District Bank Election |
District Bank Election | जिल्‍हा बँकेसाठी १०,१७९ ठराव दाखल
Published on
Updated on

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेसाठी १०,१७९ ठराव दाखल झाले आहेत. बुधवारी ठराव सादर करण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाली. अखेरच्‍या दिवशी सुमारे २,६०० ठराव तालुका पातळीवरील सहायक निबंधक कार्यालयात प्राप्‍त झाले.

जिल्‍हा बँकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्‍यासाठी पात्र १२,२४३ विविध सहकारी संस्‍थांकडून ठराव मागविण्‍याची प्रक्रिया सुरू होती. ठराव सादर करण्‍यासाठी बुधवारी (दि. ९) अंतिम मुदत होती. मुदतीत १२,२४३ पैकी १०,१७९ ठराव दाखल झाले आहेत.

दोन हजार संस्‍थांची पाठ

पात्र संस्‍थांपैकी सुमारे २,०६४ संस्‍थांनी ठराव सादर केलेले नाहीत. या संस्‍थांनी बँकेच्‍या निवडणूक प्रक्रियेकडे पाठ फिरवली असली, तरी यामधील बहुतांश संस्‍था या अवसायन, नोंदणी रद्द, व्‍यक्‍ती सभासदमधील आहेत. त्‍यामुळे याचा बँकेच्‍या निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाही.

व्‍यक्‍ती सभासदांमधून शून्‍य ठराव

इतर संस्‍थांमध्‍ये व्‍यक्‍ती सभासदांचा समावेश आहे. या गटातून ६५५ ठरावधारक होते. यापैकी ६५१ ठरावधारक मयत असून केवळ ४ सभासद हयात आहेत; पण या चार पैकी एकानेही ठराव सादर केलेला नाही.

विविध गटांतून आलेले ठराव असे

गट ठराव संख्‍या

विकास सेवा संस्‍था १९४०

साखर कारखाने, पणन संस्‍था ६८

शेतीमाल प्रक्रिया संस्‍था ८७६

सहकारी बँक, पतसंस्‍था १४१७

पदुम ४२८१

पाणीपुरवठा १५९७

व्‍यक्‍ती सभासद -

बँकेसाठी तालुकानिहाय प्राप्‍त झालेले ठराव असे

कोल्‍हापूर शहर : ४१४

करवीर : १३६५

हातकणंगले : १३६७

शिरोळ : ८८२

कागल : ११२९

गडहिंग्‍लज : ६४८

चंदगड : ५६३

आजरा : ४३७

भुदरगड : ७६३

राधानगरी : ९१५

गगनबावडा : २७०

शाहूवाडी : ४३१

पन्‍हाळा : ९९५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news