कोल्हापूर

मासे पकडण्याच्या जाळ्यात अडकले मगरीचे पिल्लू; पुलाची शिरोली परिसरात घबराहट

अमृता चौगुले

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : शिरोली एमआयडीसी येथे मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळ्यात मगरीचे पिल्लू सापडले. यामुळे पुलाची शिरोली परिसरात  नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे पिल्लू दोन फूटाचे आहे. यावरून या परिसरात मोठ्या ही मगरींचा वावर असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महामार्गालगत शिरोली पुलाची येथील दर्गाशेजारील पंचगंगा नदी पात्रात प्रशांत गांधी यांच्या शेता शेजारी मच्छिमार गनी बाळू फकीर यांनी मंगळवारी सायंकाळी मासे पकडण्यासाठी जाळे टाकले होते. हे जाळे बुधवारी (दि.८) सकाळी काढण्यात आले. यावेळी या जाळ्यात मगरीचे दोन फुटाचे पिल्लू असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शिरोली पोलिस ठाण्यात फोन करून याबाबत माहिती दिली.

घटनास्थळी शिरोली पोलिसानी धाव घेत याची माहिती वनविभागाच्या अधिका-यांना दिली. पण परिसरात मगरीचे पिल्लू सापडल्याने मोठ्याही मगरीचा वावर असणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. वनअधिका-यांनी नागरिकांच्या मदतीने मगरीच्या पिल्लू आदिवासात परिसरात सोडण्यात आले आहे.

गेल्‍या वर्षी आलेल्या महापुरात शिये टोल नाका परिसरात काही नागरिकांना मगरीचे दर्शन झाले होते. पण त्यावेळी नागरिकांनी परिसरात मगरीचा शोध घेतला. परंतु, मगरी आढळून आली नव्हती. तेव्हापासून नदीकाठी गवतासाठी जाणारे लोक भितीमुक्त झाले होते.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT