कोकण

वातावरण निवळले… खोल समुद्रातील मासेमारीला वेग; देवगड बंदर गजबजले

Shambhuraj Pachindre

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड बंदर येथील समुद्र किनारी वातावरण निवळल्याने खोल समुद्रातील मासेमारीला वेग आला आहे. यामुळे बहुतांशी नौका मासेमारीसाठी उतरल्या आहेत. यामुळे गेली दोन महिने सुनेसुने असलेले बंदर आता गजबजले आहे. मात्र, चांगली मासळी मिळूनही चांगला दर मिळत नसल्याने मच्छीमारी वर्गात नाराजी आहे.

दर्याला नारळी पौर्णिमेस श्रीफळ अर्पण केल्यानतंर गेल्या दोन महिन्यांच्या कालावधी नंतर १ऑगस्ट पासून खोल समुद्रातील मासेमारीला सुरूवात झाली. मात्र, सुरवातीला प्रतिकूल वातावरणामुळे मोठ्या यांत्रिकी नौकांद्वरे मासेमारीला सुरूवात होण्यास उशीर झाला. मात्र आता नारळी पौर्णिमा झाल्यानंतर वातावरण निवळले आहे. यामुळे मासेमारीला वेग आला असून ७० टक्के नौका मासेमारीसाठी उतरल्या आहेत.

यांत्रिकी नौकाना म्हाकुल न्हय मासेमारीला सुरमई, मोरी ही मासळी मिळत आहे. मात्र माशांना दर नाही. अशी खंत स्थानिक मच्छीमार विकास कोयंडे यांनी व्यक्त केली. सध्या बहुतांशी नौका मासेमारीसाठी उतरल्याने देवगड बंदर गजबजले आहे

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT