Vaibhav Rane (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Mahayuti Scheme Criticism | आनंदाचा शिधा महायुती सरकारने हिंदूंची मते मिळवण्यासाठीच वाटला होता का?

माजी आ. वैभव नाईक यांचा सवाल

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना गतवर्षी महायुती सरकारने गणेशोत्सवाच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला होता. गणेशोत्सव हा हिंदूंचा सण असल्याने हा आनंदाचा शिधा देण्यात आल्याचे त्यावेळी एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारने सांगितले होते. या माध्यमातून लोकांना मदत करत असल्याचेही सांगण्यात आले. मात्र हे सर्व खोटे होते केवळ विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकांची मते मिळविण्यासाठी त्यावेळी आनंदाचा शिधा वाटण्यात आला होता हे आता सिद्ध झाले आहे. केवळ हिंदूंची मते मिळवण्यासाठीच हा शिधा वाटण्यात आला होता का? असा सवाल ठाकरे शिवसेनेचे माजी आ. वैभव नाईक यांनी केला आहे.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात वैभव नाईक यांनी म्हटले आहे की, या वर्षीच्या गणेशोत्सवात हा आनंदाचा शिधा अद्यापपर्यंत वाटण्यात आलेला नाही. त्यावेळी ज्यांनी आनंदाच्या शिध्याची घोषणा केली होती ते आज सर्वजण सत्तेत आहेत. तरी देखील यावर्षी आनंदाच्या शिद्याचा जाणीवपूर्वक विसर सत्ताधार्‍यांना पडला आहे. याचा आम्ही हिंदू म्हणून तीव्र निषेध व्यक्त करतो.

आनंदाचा शिधा योजनेत आनंद दिघेंचे नाव असल्याने हा शिधा देण्यात आला नाही का? की सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे म्हणून हा शिधा दिला नाही का? की केवळ निवडणुकीपुरतेच महायुतीच्या सत्ताधार्‍यांना हिंदू आणि हिंदूंचे सण आठवतात का? याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आ. वैभव नाईक यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT