Crime News pudhari photo
सिंधुदुर्ग

Tourists steal car and flee| पर्यटक म्हणून आले अन् कार घेऊन पसार झाले

पर्यटक म्हणून आले अन् कार घेऊन पसार झाले

पुढारी वृत्तसेवा

सावंतवाडी : गोवा मोपा एअरपोर्ट येथे येणाऱ्या मित्रांना घेऊन येतो असे सांगून मारुती वॅगनार कार दोघानी नेऊन फसवणूक करून लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. ही घटना सावंतवाडी तालुक्यातील निरवडे झरबाजार वाडी येथील आनंदी पर्यटन निवास व न्याहारी केंद्र येथे घडली. याप्रकरणी कार मालक महादेव भालचंद्र पवार (वय ४५) यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात दोघा केरळच्या पर्यटकाविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पर्यटक आशिष अँथोनी व नेहा आर. खी (दोन्ही रा. निरवार्थील, थन्नीर मुक्कम अलप्पुझा केरळ) या दोघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महादेव पवार यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार श्री. पवार यांच्या निखडे झरबाजारवाडी येथे आनंदी पर्यटन निवास व न्याहारी केंद्र आहे. या केंद्रामध्ये ११ नोव्हेंबर रोजी केरळ येथील आशिष एंथोनी व नेहा आर रखी ही दोघे राहण्यास आली होती. यावेळी दोघांनी आमचा मित्र मोपा एअरपोर्ट येथे येणार आहे. त्याला आम्ही एअरपोर्ट येथे जाऊन येथे हॉटेलमध्ये घेऊन येतो यासाठी आम्हाला आपली मारुती वॅगनार कार पाहिजे असे सांगत फिर्यादी महादेव पवार यांचा विश्वास संपादन केला. कारण ही दोघे आपल्या निवास केंद्रामध्ये राहत असल्याने ते परत येतील या विश्वासाने त्यांना गोवा येथे जाण्यास त्यांनी आपली कार दिली. त्यानुसार ही दोघे गुरुवारी १२ नोव्हेंबर रोजी स.९ वा. कार घेऊन गेले.

दुपारपर्यंत ते दोघे पर्यटक कार घेऊन परत आले नाहीत. म्हणून मालक महादेव पवार यांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे फोन स्विच ऑफ येत होते. नंतर श्री. पवार यांनी जीपीएसची मोबाईल द्वारे लोकेशन तपासले असता कार केरळ कन्नूर येथे असल्याचे उघडकीस आले. आपली कार या दोघांनी विश्वास संपादन करून लबाडीने चोरी करून नेली अशी तक्रार पवारांनी सावंतवाडी पोलीस स्टेशनला दिली. त्यानुसार त्या दोघा पर्यटकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावंतवाडी पोलिसांनी तत्काळ याचा तपास सुरू केला. तपासात त्या कारचा शोध लागला असून आणि त्या दोघांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT