वेंगुर्लाः वेंगुर्ला पोलिसांनी आज रविवारी वेंगुर्ला भटवाडी येथे सकाळी 11 वाजता गोवा बनावटीच्या दारु व कारसह एकूण 2,03,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यामध्ये 1400 रुपये किमतीची एक Royal Challange असे इंग्रजी लेबल असलेली गोवा बनावटीच्या दारूने भरलेली 2 लिटर मापाची प्लास्टिकची बाटली, 2500 रुपये किमतीच्या Oxsmith Gold असे इंग्रजी लेबल असलेल्या गोवा बनावटीचे दारूने भरलेल्या 180 मिली मापाच्या कंपनी सीलबंद 10 प्लास्टिक बाटल्या व 2 लाख रुपये किमतीची एक मारुती कंपनीची ईरटीगा (गाडी नं. MH-07-AB-1916) असा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी सिताराम भगवंत शेणई (वय 44 वर्षे, रा. ता.कुडाळ ) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम. 65 (अ)(ई) प्रमाणे वेंगुर्ला पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अक्षय पाटील यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश सराफदार हे अधिक तपास करीत आहेत.