Suspension File Photo
सिंधुदुर्ग

Sindhudurg MSRTC news: एसटीचे सिंधुदुर्ग विभागीय वाहतूक अधिकारी निलंबित

कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कारवाई

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रशासकीय कारभारात हलगर्जीपणा आणि आर्थिक नुकसानीस जबाबदार धरत नाशिक विभागातील ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केल्याची घटना घडली असतानाच एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी सिंधुदुर्ग विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी विक्रम देशमुख यांना कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत निलंबित केले आहे. यामुळे विभागात एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखीही काहीजण या कारवाईच्या रडारवर असल्याचे समजते.

राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अलिकडेच एसटी महामंडळातील सर्व विभागांना उत्पन्न वाढीचे आदेश दिले असून जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करणार नाहीत त्यांना निलंबित करण्याचे सुतोवाच त्यांनी केले होते. एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ आणि खर्चात कपात या उद्दिष्टांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर यापुढे कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी नाशिक विभागातील ११ वरिष्ठ अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.

कारवाईमुळे विभागात खळबळ

नाशिक बरोबरच इतर विभागातील अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यात आता सिंधुदुर्गच्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, या वृत्ताला विभाग नियंत्रकांनी दुजोरा दिला आहे. या कारवाईमुळे विभागात खळबळ उडाली असून, उत्पन्न वाढीसाठी आता सर्वच अधिकाऱ्यांना ठोस पावले उचलावी लागणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT