Nashik Naib Tehsildar | निवासी नायब तहसीलदार मारहाणप्रकरणी कारवाई करावी

Nashik Naib Tehsildar | तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
 Latur News
Latur News
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अवैध मुरूम उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी गेलेल्या निवासी नायब तहसीलदारावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे प्रशासनातील अधिकारी आक्रमक झाले आहेत. येवला तालुक्यातील पारेगाव येथे अवैध मुरूम उत्खननाबाबत कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला विरोध करीत नायब तहसीलदारासह कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केला आहे.

 Latur News
Illegal Sand Excavation : वाळूचोरीच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करा

मारहाणीच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित दोषींवर कठोर कारवाईची मागणी संघटनेने केली आहे. संघटनेने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यात, येवला तालुक्यातील पारेगाव परिसरात बेकायदेशीर व अवैध मुरूम उत्खनन आणि वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, ग्राम महसूल अधिकारी संतोष आवळे आणि वाहनचालक वैभव भड घटनास्थळी पोहोचले.

महसूल पथकाने संबंधित डंपरचालक व उत्खननाशी संबंधित व्यक्तींकडे परवानगीपत्र आणि रॉयल्टी कागदपत्रांची मागणी केली होती. मात्र, कागदपत्रे न दाखवता संबंधितांनी अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली. अरेरावीची भाषा वापरत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. यावेळी नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप संघटनेने केला आहे. त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

 Latur News
Parbhani News : परभणीत एफडीएची मोठी कारवाई; ३.४७ लाखांचा नियमबाह्य अन्नसाठा जप्त

या घटनेमुळे महसूल अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या जिल्हा शाखेने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन हल्लेखोरांविरोधात कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. महसूल अधिकाऱ्यांना संरक्षण द्यावे तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अध्यक्ष आबासाहेब ताबे, सहअध्यक्ष कुंदन हिरे, सचिव डॉ. मिलिंद कुलकर्णी, श्याम वाडकर, डॉ. अमित पवार, आबा महाजन, कैलास चावडे, उषाराणी देवगणे यांनी केली आहे.

महसूल प्रशासनात नाराजी

या घटनेनंतर महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाचा महसूल वाचविण्यासाठी आणि अवैध गौणखनिज उत्खनन रोखण्यासाठी कार्यरत अधिकाऱ्यांवरच हल्ले होत असतील, तर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निर्भयपणे काम कसे करावे, असा प्रश्न संघटनेने उपस्थित केला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news