सिंधुदुर्ग, कणकवली स्टेशनवर नव्या जलद गाड्यांना थांबे  (File Photo)
सिंधुदुर्ग

Sindhudurg Railway Stop | सिंधुदुर्ग, कणकवली स्टेशनवर नव्या जलद गाड्यांना थांबे

पालकमंत्री राणेंच्या प्रयत्नाला यश

पुढारी वृत्तसेवा

ओरोस : रेल्वे बोर्डाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार च्या कणकवली व सिंधुदुर्ग स्थानकांवर काही गाड्यांना थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सिंधुदुर्ग स्थानकावर हजरत निजामुद्दीन एक्स. व अजमेर मरुसागर एक्स. आणि कणकवली स्टेशनवर हिस्सार-कोईबतूर व गांधीधाम- नागरकॉईल एक्स. या चार गाड्यांना थांबा दिला आहे. कोकण रेल्वे प्रवाशांना ही दिवाळी भेटच मिळाल्यामुळे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय आणि संघर्ष समितीच्या वतीने पालकमंत्र्यांना धन्यवाद दिले जात आहेत.

नुकत्याच झालेल्या रेल्वे बोर्ड बैठकीमध्ये रेल्वे मंत्रालयाने सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर वरील चार लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्रयोगीक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत रेल्वे बोर्डाकडून 17 ऑक्टोबर 2025 रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत रेल्वेमंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती, त्यांचे हे प्रयत्न यशस्वी ठरले असून रेल्वेने सिंधुदुर्ग व कणकवली रेल्वे स्थानकावर मागणीप्रमाणे गाड्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

सिंधुदुर्ग स्थानकावर एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस आणि एर्नाकुलम - अजमेर मरुसागर एक्स्प्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. कणकवली स्थानकावर हिसार- कोईबतूर एक्स्प्रेस आणि गांधीधाम - नागरकोईल एक्स्प्रेस या दोन गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.

रेल्वे बोर्डाने स्थानिक स्तरावर तिकिट विक्रीवर लक्ष ठेवण्याचे व या गाड्यांच्या वेळेबाबत प्रवाशांना योग्य ती माहिती मिळावी यासाठी या निर्णयाची व्यापक प्रसिद्धी देण्याचे आणि अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोकण रेल्वे कोकणी माणसाची आहे. यामुळे त्याचा लाभ कोकणला मिळाला पाहिजे, या भावनेतून ना. राणे यांनी गेल्या महिन्यांमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आणि जिल्ह्याचे मुख्यालय असलेले सिंधुदुर्ग व कणकवली स्टेशनवर जलद गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी लावून धरली होती. त्याला यश आले असून रेल्वे प्रवाशातून आनंद व्यक्त होत आहे. याबाबत प्रवासी समन्वय संघर्ष समितीने पालकमंत्र्यांना शुभेच्छा व धन्यवाद दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT