Grandson Arrested for Robbing Grandmother 
सिंधुदुर्ग

Grandson Arrested for Robbing Grandmother | आजीला लुटणारा नातू अन् त्याचा मित्र जेरबंद

Sindhudurg Crime Alert- आजीला लुटणारा नातू अन् त्याचा मित्र जेरबंद

पुढारी वृत्तसेवा

कणकवली : तीन दिवसांपूर्वी ओटव येथील एका वृद्धेकडील सोन्याचा ऐवज जबरदस्तीने चोरी करत संशयित आरोपी साईल ऊर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (वय २१, रा. वसई रोड, ठाणे) व मुकेश महेंद्र पाटणे (२८, रा. साईनाथनगर विरार) या दोघांनी पळ काढला होता. याप्रकरणी दोन्ही आरोपींना गुन्हा अन्वेषण शाखेने शनिवारी सायंकाळी मुंबई-भाईंदर येथून सापळा रचत बेड्या ठोकल्या.

ओटव-ओटववाडी येथील सुवर्णा नारायण रावले (वय ६६) हिचे तोंड दाबून धरत व डोळे बंद करत तिच्या गळ्यातील १९.५ ग्रॅम वजनाचे दागिने तिचा नातू सिद्धेश रसाळ व त्याच्या मित्राने बुधवार, २२ रोजी सकाळी ११.३० वा. लांबवले होते. याबाबत सुवर्णा रावले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या दोन आरोपींविरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सिंधुदुर्ग गुन्हा अन्वेषण विभागाच्या वतीने तांत्रिक विश्लेषण व मानवी कौशल्य वापरत गुन्हा घडल्यापासून अवघ्या तीन दिवसांत आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन रविवारी कणकवलीत आणण्यात आले.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक हनुमंत भोगले, सहा. पोलिस निरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्वर टवटे, किरण देसाई, व्हिल्सन डिसोजा यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT