सावंतवाडी : नागेश पाटील
सावंतवाडी शहराला लागूनच असलेल्या नरेंद्र डोंगरावर लाखो रुपये खर्च करुन उभारण्यात आलेला 'वनउद्यान प्रकल्प' गेली अडीच वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. सावंतवाडी शहराच्या पर्यटन विकासाठी महत्त्वाकांक्षी असलेला हा प्रकल्प वन विभागाच्या उदासिनतेमुळे रखडला आहे. उद्यान प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणारे ट्री हाऊस, हट्स, उद्यान आदी महत्त्वाची कामे प्रलंबित आहेत. एकीकडे शासन पर्यटन विकसासाठी शहरांना निधी देत आहे तर दुसरीकडे प्रशासकीय अनास्थेमुळे पर्यटन प्रकल्प वर्षानुवर्षे रखडत आहेत.
सावंतवाडी शहराला निसर्गवैभव लाभले आहे. शहराला लागूनच नैसर्गिक सौंदर्याने संपन्न नरेंद्र डोंगर आहे. या निसर्गाला पर्यटनाचा नवा साज मिळावा यासाठी आ. दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून दोन वर्षांपूर्वी 'नरेंद्र वन उद्यान' हा पर्यटन प्रकल्प मंजूर करण्यात आला. या प्रकल्पासाठी वनविभागाकडून १० लाख उभारण्याचे नियोजन होते. त्यानुसार वनविभागाने अडीच वर्षापूर्वी उद्यान उभारण्यासाठी जोरदार सुरुवात केली. या उद्यानाची आकर्षक कमान पर्यटकांचे लक्ष वेधून घेत होती.
मात्र कामाच्या शुभारंभानंतर रुपये निधीही मंजूर करण्यात आला. वनविभागाचा हा दिशादर्शक प्रयोग असल्याचे सांगण्यात आले होते. या निधीतून नरेंद्र उद्यान, माहिती केंद्र, ट्री हाऊस आदी पर्यटन प्रकल्प कामाचा वेग मंदावला. सध्या या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरु आहे. एक ट्री हाऊस व माहिती केंद्र सोडले तर २० टक्के सुशोभिकरण व उर्वरीत ट्री हाऊस, हट्स उभारणीचे काम प्रलंबीत आहे.
सावंतवाडी शहराच्या सौंदर्याचा मुकुट म्हणून नरेंद्र डोंगर प्रसिध्द आहे. या डोंगरावर विविध वन्यजीव, निसर्ग संपन्नता, वेगवेगळया प्रकारचे पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी, कीटक आढळून येतात. त्यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे नेहमीच आकर्षण ठरले आहे. येथील वनसंपदा, जैवविविधता पर्यटकांना भावत आहे. याच माध्यमातून पर्यटन वाढवण्याबरोबरच शाश्वत रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी आ. केसरकर यांचा प्रयत्न होता. मात्र वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने हा प्रकल्प सध्या शेवटची घटका मोजत आहे. सुरुवातीला वनविभाने येथे काही पर्यटन स्थळांचा विकास केला त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढू लागली. मात्र गेल्या वर्षी आलेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने वनउद्यान प्रकल्पाचे बरेच नुकसान केले. त्यानंतर याकडे कोणीही लक्ष न दिल्याने या प्रकल्पाची अवस्था दयनीय बनली आहे. या नरेंद्र डोंगराला संस्थानकालीन वारसा आहे.
'चांदा ते बांदा' या योजनेतील कामेही अर्धवट
वन उद्यान सफारीसाठी 'रत्नसिंधू' योजनेतून वाहने देण्यात आली, परंतु पर्यटकांसाठी ही सुविधा कायम सुरु ठेवण्यास येत नाही. आ. केसरकर यांनी युती सरकारच्या काळात 'चांदा ते बांदा' या योजनेतून पर्यटनासाठी मोठा निधी दिला. त्यातून रोजगार निर्मिती होईल अशी अपेक्षा होती. मात्र पर्यटकांना आकर्षित करण्यात वनविभाग सपशेल अपयशी ठरले आहे. डोंगरावर असलेले सावंतवाडी दर्शन, मनोरा, पर्यटकांसाठी राहण्याकरिता वातानुकुलित नैसर्गिक घरे, प्रसाधनगृह यांचेही काम अपूर्ण अवस्थेत आहे.