नांदगाव : मुंबई-गोवा महामार्गावर जि.प. प्राथमिक शाळा, कासार्डे -जांभूळवाडी समोर कासार्डेतून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर दुचाकीसमोर अचानक गाय आल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीची धडक बसून गायीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली. गुरुवारी दुपारी 3.30 वा.च्या सुमारास हा अपघात झाला.
दुचाकीस्वार श्रीनाथ नायर (33) हा दुचाकीने मुंबई ते गोवा जात होता. महामार्गावर कासार्डे-जांभूळवाडी येथे तो आला असता अचानक एक गाय त्याच्या दुचाकीसमोर आली, परिणामी त्याच्या दुचाकीची धडक त्याची धडक गायीला बसली. ही धडक एवढी जोरदार होती की गाय जागीच ठार झाली तर दुचाकीस्वाराच्या डोक्याला दुखापत होत हात जयाबंदी झाला. अपघातानंतर स्थानिकांनी 108 रुग्णवाहिकेने जखमी श्री. नायर याला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.