वेंगुर्ले : तालुक्यातील आडेली कामळेवीर येथे राहत्या घरातून समोरील दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील 20 हजाराची रक्कम चोरून नेली. ही घटना शुक्रवारी सकाळी ८.३० ते दुपारी १ च्या दरम्यान घरात कोणीही नसताना घडली.
याबाबत गिरीश दशरथ आळवे (वय ४४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वेंगुर्ले पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, पोलीस हवालदार योगेश राऊळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत दाखल फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस हवालदार योगेश राऊळ हे करीत आहेत.