ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जिल्ह्यातील 432 ग्रामपंचायतींसाठी 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीकरिता सरपंचपदाची आरक्षण सोडत मंगळवार, 15 जुलै रोजी जाहीर होणार आहे. या सोडतीमुळे अनेक इच्छुकांचे भवितव्य ठरणार असून, गावपातळीवरील राजकारणाची दिशा निश्चित होणार आहे.
ही आरक्षण सोडत प्रत्येक तालुकास्तरावर होणार असून, यात महिलांसाठी 50 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यानुसार तब्बल 218 सरपंचपदे महिलांच्या वाट्याला येणार आहेत. ही आरक्षण सोडत मंगळवार 15 जुलै रोजी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी काढण्यात येणार आहे
एकूण ग्रामपंचायती : 432
महिलांसाठी राखीव : 218 पदे
अनुसूचित जाती : 29 (15 महिला)
अनुसूचित जमाती : 03 (02 महिला)
नागरिकांचा मागास प्रवर्ग : 117 (59 महिला)
सर्वसाधारण : 283 (142 महिला)
या आरक्षण सोडतीनंतर जिल्ह्यातील गावपातळीवरील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलणार असून, इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे या सोडतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.