कासार्डे येथे भूउत्खलनात जमिनदोस्त झालेली विहीर (Pudhari File Photo)
सिंधुदुर्ग

Kasarde Water Supply Well Collapse | नांदगावात सततच्या पावसाने पाणीपुरवठा विहीर जमिनदोस्त

Piyali River Erosion | पियाळी नदीच्या काठावरची ग्रामपंचायतीची विहीर कोसळली

पुढारी वृत्तसेवा

नांदगाव : सतत पडणा-या पाऊसामुळे कणकवली तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायतीची मुंबई गोवा महामार्गालगत पियाळी नदीच्या बाजूला असणारी पाणीपुरवठा करणारी विहीर भूउत्खलनामुळे जमिनदोस्त झाली. यामुळे विहिरीच्या सिमेंट कठडयासह लोखंडी बार व पाणी उपसा करणा-या पंपासह लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत तातडीने कणकवली गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यानी भेट देत पाहणी केली.

यावेळेस कासार्डे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे,ग्रामपंचायत अधिकारी गजानन कोलते,तंटामुक्त अध्यक्ष श्रीरंग पाताडे,ग्रा.पं.सदस्य सहदेव उर्फ आण्णा खाडये याच्यासह पंचायत समिती अधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. पाहणी नतंर ताताडीने पंचनामा करून सुमारे पंचवीस लाखाचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आले आहे.

सदरची विहीर ४० वर्षे जूनी असून सध्या सतत पडणारा पाऊस व पियाळी नदीला येणारा पुराच्या पाण्याचा वेढा यामुळे ही विहीर कमकुवत होत भूउत्खलन झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला असून या विहीरीच्या माध्यमातून कासार्डे जांभळगाव, सरवणकरवाडी, कासार्डे दक्षिण गावठण परीसरात पाणीपुरवठा होत होता.मात्र तातडीने या घटनेची दखल गेत ग्रामपंचायताने तातडीने पाणीपुरवठा होण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.तसेच तातडीने निधी मंजूर व्हावा यासाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागास पाठपुरावा करणार असल्याचे सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामपंचायत अधिकारी गजानन कोलते,सहदेव खाडये यानी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT