सिंधुदुर्ग छेडछाड प्रकरण 
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग : छेडछाड प्रकरण; आणखी एकाचा शोध घ्या, ग्रामस्थांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

देवगड : युवती छेडछाड प्रकरणातील संशयितांना शिक्षा होईल असा तपास करा, या गुन्हयात वापरलेली गाडी घेवून जाणाऱ्या सातव्या संशयितांचा शोध घ्या, अशी मागणी देवगडमधील ग्रामस्थांनी पोलिस उपविभागीय अधिकारी घनश्याम आडाव यांच्याकडे केली. यावेळी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांना झालेली मारहाण याबद्दल आपल्याला काहीच माहित नसल्याचे आडाव यांनी सांगितल्याने ग्रामस्थांनीही आश्चर्य व्यक्त केले. या गुन्ह्यातील सर्व गुन्हेगारांना शिक्षा होईल, अशी ग्वाही आडाव यांनी ग्रामस्थांना दिली.

ग्रामस्थांचा आक्रमक भुमिकेनंतर देवगड पोलिस ठाण्याच्या परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. तसेच राज्यराखीव पोलिस दलाची कुमकही पोलिस ठाण्याच्या परिसरात दाखल झाली. ग्रामस्थांशी उद्धट वर्तन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा अहवाल सादर करा, अशा सुचना डीवायएसपी आडाव यांनी पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांना दिल्या. दरम्यान युवतीच्या छेडछाडप्रकरणी देवगड जामसंडेमधील ग्रामस्थांनी देवगड पोलिस ठाण्यात आलेल्या पोलिस उपविभागीय अधिकारी धनश्याम आडाव यांची भेट घेवून गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी केली.

तसेच संशयितांनी वापरलेली गाडी देवगड नांदगांव मार्गावर असलदे या ठिकाणी आढळली. ही गाडी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजले, मात्र ही गाडी तेथे कोण घेवून गेला याची चौकशी व्हावी, यामध्ये गाडी घेवून जाणारा चालक कोण होता. सातवा आरोपी असल्यास त्याचा शोध घ्यावा, घटनेवेळी पोलिस स्थानकात तसेच ग्रामीण रूग्णालयात गेलेल्या ग्रामस्थांशी उर्मट वर्तन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच पोलिस ठाण्यात ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे ज्या ठिकाणी नाहीत, त्या ठिकाणी बसविण्यात यावेत.अशीही मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. यावेळी अ‍ॅड.प्रसाद करंदीकर, अ‍ॅड.सिध्देश माणगांवकर, सुधीर मांजरेकर, राजू पाटील, रविकांत चांदोस्कर, सुरेश उर्फ पपु कदम, बंटी कदम, सौरभ सहस्त्रबुध्दे, ऋत्विक धुरी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच पोलिस निरिक्षक अरूण देवकर, मनोज सोनवलकर आदी अधिकारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT