railway track tampering case
प्रातिनिधिक छायाचित्रfile photo

धक्‍कादायक! रेल्‍वे कर्मचार्‍यांनीच केली रुळांशी छेडछाड,कारण ऐकून पाेलीसही चक्रावले

गुजरातमधील सुरत जिल्‍ह्यातील प्रकार, तिघा रेल्‍वे कर्मचार्‍यांना अटक
Published on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : रेल्‍वेचा संभाव्‍य धोका टाळला याचे श्रेय मिळावे. आपल्‍या सत्‍कार व्‍हावा, आपल्‍याला सन्‍मान मिळावा, या हेतूने कर्मचार्‍यांनीच चक्‍क रेल्‍वे रुळाशी छेडछाड केली असल्‍याचा धक्‍कादायक प्रकार गुजरातमधील सुरत जिल्‍ह्यात समोर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी रेल्वेच्या मेंटेनन्स विभागात ट्रॅकमन सुभाष पोद्दार (३९), मनीष मिस्त्री (२८) आणि शुभम जैस्वाल (२६) यांना अटक केली आहे.

रेल्‍वे अपघात घडविण्‍याचा डाव उधळण्‍याचा दावा 

कोसंबा ते किम स्थानकांदरम्यान शनिवारी पहाटे तपासणी सुरूहाेती. यावेळी रेल्वे कर्मचारी सुभाष पोद्दार आणि इतरांनी रेल्वे प्रशासनाला कळवले होते की, काहींनी ट्रॅकवरून क्लिप आणि दोन फिश प्लेट्स काढल्‍या आहेत. रेल्‍वेचा अपघात व्‍हावा यासाठी हे कृत्‍य करण्‍यात आल्‍याचा दावा या कर्मचार्‍यांनी केला होता. या प्रकरणी किम पोलिस ठाण्‍यात अज्ञात संशयितांविरुद्ध गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.

पाेलीस तपासात धक्‍कादायक माहिती उघड

या प्रकरणी पोलीस अधीक्षक होतेश जोयसर यांनी सांगितले की, रेल्‍वेच्‍या तीन कर्मचार्‍यांनी रात्रीच्या गस्तीदरम्यान त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ट्रॅक टेम्परिंगचा व्हिडिओ पाठवला होता. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, या तिन्ही कर्मचाऱ्यांनी ट्रॅक छेडछाड केल्याचे समोर येण्यापूर्वीच एक ट्रेन या मार्गावरून गेली होती. तपासात असे आढळून आले की ट्रॅक छेडछाड शोधणे आणि ट्रेन पास करणे यामधील वेळ खूप कमी आहे. इतक्या कमी वेळात क्लिप आणि प्लेट काढणे शक्य नव्हते, असे रेल्‍वे अधिकार्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

आरोपींनी दिली गुन्‍ह्याची कबुली

केल्‍यानंतर माहिती देणार्‍या तीन रेल्‍वे कर्मचार्‍यांचे मोबाईल तपासण्यात आले. पहाटे 2:56 ते पहाटे 4:57 या वेळेत ट्रॅकवर छेडछाड करण्याचे व्हिडीओ शूट केल्याचे तपासात आढळून आले. संशयित मनीष मिस्त्रीने काढलेली छायाचित्रेही हटवली होती. यावरून हे सिद्ध झाले की, सकाळी साडेपाचच्या सुमारास ही छायाचित्रे आणि व्हिडीओ काढण्यात आले होते, अधिकाऱ्यांना तोडफोडीची तक्रार करण्यासाठी बोलावले जाण्यापूर्वीच. यानंतर तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. संभाव्‍य मोठा धोका टाळल्‍याने आपला रेल्‍वेकडून सन्‍मान व्‍हावा, तसेच कुटुंबासोबत दिवसा वेळ व्‍यतित करता यावा, यासाठी नाईट ड्युटीवर मिळावी या हेतूने तीन कर्मचार्‍यांनी हे कृत्‍य केले होते, असेही होतेश जोयसर यांनी स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news