वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील टाक -न्हयचीआड येथील जुवांव ऊर्फ जॉनी सालू फर्नांडिस (वय 32) हा युवक आंघोळीसाठी न्हयचीआड येथील खाडीच्या पाण्यात उतरला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. ‘सांज्युआंव’ सणानिमित्त आंघोळीसाठी उतरला असताना ही दुर्घटना घडली. याबाबत वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मंगळवारी सायंकाळी 7.30 वा. च्या सुमारास जॉनी फर्नांडिस हा तेथील खाडीच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरला होता. मात्र काही वेळातच तो खाडी किनार्या लगत बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे हलविण्यात आले.
मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याबाबत बेंजामिन येरमु मेंतेरो यांनी दिलेल्या माहितीनुसार वेंगुर्ले पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. अधिक तपास हेड कॉन्स्टेबल श्री. कदम करीत आहेत.